Vadgaon Crime News : सहा महिन्याच्या मुलीसोबत विवाहितेची राहत्या घरी आत्महत्या

एमपीसी न्यूज – अज्ञात कारणासाठी विवाहित महिलेने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच वेळी तिच्या सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेहही त्या ठिकाणी सापडला.

ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी 11 वाजता जय मल्हार रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ वडगाव मावळ येथे घडली. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही पोलीस तपास करत आहेत.

रागिनी महेश दुधाणे (वय 27 रा. मल्हार रेसिडेन्सी खंडोबा मंदिराजवळ वडगाव मावळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर श्रीशा महेश दुधाणे असे सहा महिन्याच्या मुलीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात कारणासाठी विवाहित महिला रागिनी दुधाणे यांनी राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहा महिने वयाच्या श्रीशा दुधाणे हिचा मृतदेह सापडला.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, पोलीस हवालदार संतोष माने आदीनी जाऊन पंचनामा केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.