Vadgaon Crime News : कोर्टाचा निकाल मॅनेज करण्यासाठी अडीच लाखांची लाच घेताना महिला एसीबीच्या जाळ्यात

0

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ न्यायालयात सुरु असलेल्या केसचा निकाल मॅनेज करुन तुमच्या बाजूने लावून देतो, असे सांगून अडीच लाखांची लाच स्विकारणाऱ्या एका खाजगी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

शुभवारी भालचंद्र गायकवाड (वय 29, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची केस वडगाव मावळ कोर्टात सुरु आहे. त्या केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी कोर्ट मॅनेज करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

दरम्यान तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने 8 आणि 9 जानेवारी रोजी सापळा लावला. शुभवारी ही खाजगी महिला अडीच लाखांची लाच घेताना आज (गुरुवारी, दि. 14) एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.