Vadgaon : मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पडवळ

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) अध्यक्षपदी( Vadgaon)  नवलाख उंब्रे ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्तात्रय जयवंत पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पडवळ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

Dehugaon : देहूतील उपोषणकर्त्यांनी घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट

जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, मावळ( Vadgaon)  तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले, अविनाश बधाले, गणेश पाटोळे, किरण पवार, शंकर मोढवे, मंगेश जाधव, गणेश बोडके आदी उपस्थित होते.  पडवळ हे नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत.

यापूर्वी त्यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस आदी विविध पदांवर काम केले आहे. तालुक्यात जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे संघटन करून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय पडवळ यांनी नियुक्ती नंतर व्यक्त  केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.