Vadgaon: कान्हे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय निम्हण 

एमपीसी न्यूज – कान्हे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मोहितेवाडी – साते येथील कार्यकर्ते व माजी उपसरपंच दत्तात्रय पंडीत निम्हण यांची बिनविरोध निवड झाली.

याआधीच्या अध्यक्षा उर्मिला जांभुळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

अध्यक्षपदासाठी निम्हण यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विनोद कोतकर यांनी निम्हण यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सचिव गणपत भानुसघरे यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले.

या प्रसंगी उपाध्यक्ष बाळासाहेब काकरे, संचालक पै चंद्रकांत सातकर, महादु सातकर, दशरथ सातकर, बंडोबा सातकर, नंदाताई सातकर, लक्ष्मण आगळमे, एकनाथ येवले, दशरथ गायकवाड, उर्मिला जांभुळकर, रमेश गाडे, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय निम्हण यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.