Vadgaon : नगरसेवक श्यामराव ढोरे यांच्या वतीने 50 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप

एमपीसी न्यूज : “कर्तव्य नव्हे जबाबदारी ” या उपक्रमांतर्गत एक हात मदतीचा या न्यायाने नगरसेवक श्यामराव ढोरे यांच्या वतीने 50 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटप्रसंगी आणीबाणीच्या काळात अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत आज मंगळवारी (दि 28) ” कर्तव्य नव्हे जबाबदारी” या उपक्रमातून एक हात मदतीचा या न्यायाने वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक श्यामराव ज्ञानेश्वर ढोरे यांच्या स्व:खर्चाने प्रभाग क्रमांक 4 मधील 50 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, ज्ञानेश्वर ढोरे, नामदेव ढोरे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे, चंद्रकांत ढोरे, संतोष ढोरे, भाजपा वाॅर्ड अध्यक्ष श्रीकांत चांदेकर, सागर जाधव,वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.