Vadgaon Ganesh Utsav News : ‘गणपती बाप्पा..’च्या जयघोषात मानाच्या गणपतीचे विसर्जन

एमपीसीन्यूज : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या मानाच्या पहिला गणपतीचे आज सातव्या दिवशी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व गणेश तावरे यांच्या हस्ते आरती घेऊन महादेव मंदिर विहिरीत विसर्जन करण्यात आले.

या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया’,चा जयघोष करत करण्यात आला.

यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त सल्लागार ॲड. तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, पुजारी सुरेश गुरव व पुरोहित विश्वासराव भिडे आदी उपस्थित होते.

वडगाव शहरात गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल देवस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व वरिष्ठ पोलीस गणेश तावरे यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.