Vadgaon News : सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी शंकर नंदकुमार भोंडवे यांची निवड

'7 ते 14 ऑक्टोबर दरम्यान सरस्वती व्याख्यानमाला' होणार

एमपीसी न्यूज – वैचारिक जागृतीचा वारसा जपणारी मावळ विचार मंच संचलित ‘सरस्वती व्याख्यानमाला’ यावर्षी 7 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी शंकर नंदकुमार भोंडवे यांची निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी वैशाली प्रमोद म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुखपदी श्रेया पवन भंडारी, उपाध्यक्षपदी मनोज शांताराम भांगरे, सचिवपदी गिरीश नेमीचंद गुजराणी आणि खजिनदारपदी अ‍ॅड अजित दत्तात्रय वहिले यांची निवड करण्यात आली. व्याख्यानमालेचे यंदा 21 वे वर्ष आहे.

व्याख्यानमालेचे हे 21 वे वर्ष असून गुरुवार दि. 7 ऑक्टोबर ते गुरुवार दि.14 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता व्याख्याने सुरू होतील तसेच शुक्रवार दि. 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी – दसरा निमित्त भारतमाता प्रतिमेची मिरवणूक संपन्न होणार आहे.

मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर आप्पा म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, मावळते अध्यक्ष दिपक भालेराव, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, जेष्ठ नेते विठ्ठल घारे, श्री.पोटोबा देवस्थान संस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे, नगरसेवक अ‍ॅड.विजय जाधव , नगरसेवक किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे , माजी अध्यक्ष अतुल राऊत, रविंद्र काकडे, अरुण वाघमारे, नितीन गाडे, शेखर वहिले, अतुल म्हाळसकर, अमोल ठोंबरे, भूषण मुथा, समीर गुरव, केदार बवरे, अनिकेत सोनवणे, विनय भालेराव, जिजाभाऊ सोनवणे, दिपक शास्त्री, तानाजी शिंदे,  स वैशाली ढोरे, अश्विनी बवरे , कांचन ढमाले, सुवर्णा गाडे, किरणताई आगळे आदी उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्ष भास्कर म्हाळसकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून नूतन कार्यकरिणीला शुभेच्छा देतांना प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांची मेजवानी देण्याचे कार्य संपन्न होणार असल्याचे सांगितले.

नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे अधिकाधिक सुरेख पद्धतीने आणि कोरोना नियमांचे पालन करून नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्वागत मावळते अध्यक्ष दिपक भालेराव यांनी केले. प्रास्ताविक अ‍ॅड.विजय जाधव यांनी तर आभार अरुण वाघमारे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.