Vadgaon : मावळात दिवसभरात 11 पॉझिटिव्ह: रुग्ण संख्या पोचली 98 वर

in Maval , 11 positives in a day: the number of patients reached 98

0

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, मंगळवारी लोणावळा येथील चार, तळेगाव येथील दोन व धामणे येथील पाच अशा अकरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 51 इतकी झाली आहे.

धामणे येथील एका कोरोना बाधित महिलेचा 27 तारखेला मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब सोमवारी (दि 29) घेण्यात आले होते. त्यातील तिचा पती (वय 30), सासू (वय 45), दीर (वय 31), जाऊ (वय 21) व आई (वय 45) अशा पाच जणांचे अहवाल आज मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत.

तर डोंगरगाव येथील रहिवासी व लोणावळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याचा अहवाल 28 तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या निकटच्या संपर्कातील आजी (वय 65),आजोबा (वय 69) व वडिलांचा (वय 48) स्वॅब सोमवारी (दि 29) घेण्यात आला होता. या तिघांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

लोणावळा शहर पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी 27 तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील ओळकाईवाडी येथील 27 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तळेगाव येथील परांजपे शाळा परिसरातील एका 40 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने 27 तारखेला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 29 तारखेला तिचा स्वॅब घेण्यात आला होता. मंगळवारी तो पॉझिटिव्ह आला.

तळेगाव येथील जमादार कॉलनी मधील 42 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला ह्या दोघा पती- पत्नीचा सोमवारी (दि 29) कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. आज त्यांच्या संपर्कातील त्यांच्या 14 वर्षीय मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

तळेगाव दाभाडे येथे आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 26 झाली असल्याचे तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. प्रवीण कानडे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या 98 झाली आहे. त्यात शहरी 39 तर ग्रामीण 59 जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक 33 जणांची नोंद झाली आहे. तालुक्यात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 43 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सक्रिय रूग्णांची संख्या 51 आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आज अखेर 33 त्यापैकी 06 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. एकाचा मृत्यू झाला असून सक्रिय रूग्णांची संख्या 26 झाली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like