Vadgaon : शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची उपनगराध्यक्षांकडून पाहणी

एमपीसी न्यूज – वडगाव शहरात नगरपंचायतच्यावतीने ( Vadgaon)  स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. या स्वच्छतागृहांची मंगळवारी (दि. 23) वडगावच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी पाहणी करत संबंधितांना दुरुस्तीबाबत सूचना दिल्या.

MPC News Podcast 24 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

उपनगराध्यक्षांनी केलेल्या पाहणीमध्ये दुरावस्थेत व मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांमध्ये अनेक ठिकाणी सोयी-सुविधांचा मोठा अभाव दिसून आला. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरपंचायत माध्यमातून स्वच्छतागृहांची त्वरित डागडुजी व दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोडकळी झालेल्या तसेच नादुरुस्त स्वच्छतागृहांची करण्याबाबतच्या सूचना स्वच्छता अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी टेकचंद नेमाडे, रवी साबळे, दिगंबर भांडे आदी उपस्थित ( Vadgaon) होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.