Vadgaon Khadakala : वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गटातील, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव आप्पा वायकर यांच्या विशेष प्रयत्नांतून व फंडातून विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज बुधवार 1 जानेवारी रोजी संपन्न झाला.

वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये एकूण 1 कोटी 17 लाख रुपयांची विकासकामे झाली. या विविध विकासकामांचा तपशील पुढीलप्रमाणे – कुसगाव 30 लाख रु., नायगाव 41 लाख रु., अहिरवडे 20 लाख रु., कान्हे फाटा 11 लाख रु., वडगाव येथे जिल्हा परिषद सदस्य कक्ष,   ब्राह्मणवाडी 6 लाख रु., मोहितेवाडी 6.5 लाख रु., नाणवली तर्फे चाकण 3 लाख रुपये,  कान्हे, मोहितेवाडी, कामशेत, पारवडी आदी ठिकाणी भजनी साहित्य वाटप, रस्ता काँक्रिटीकरण – 95.50 लक्ष रु., सर्व शिक्षण अभियान वर्ग खोल्या – 12 लक्ष, सभा मंडप – 8 लक्ष रु., हायमास्ट दिवे – 1.75 लक्ष रु., भजन साहित्य – 3 लक्ष रुपये इत्यादी.

विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, एसआरपीचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवी, काँग्रेस आयचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी सरपंच तुकाराम ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, बाळासाहेब म्हाळस्कर,  वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, युवा नेते सुनील दंडेल, नगरसेविका माया चव्हाण, पूनम जाधव, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अध्यक्ष ग्रामीण) कैलास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर, माजी सरपंच तानाजी दाभाडे, मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष  अफताब सय्यद, पंचायत समितीचे माजी सदस्य  लक्ष्मण बालगुडे, ज्येष्ठ नेते प्रकाश कुडे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वहातूक संघटनेचे  नामदेव शेलार, नगरसेवक राजेंद्र कुडे, गणेश ढोरे,भाऊसाहेब ढोरे,गणेश गो.ढोरे,सुहास वायकर,अक्षय रौधळ,सुजित माझीरे,सुनील चव्हाण, विष्णू गायखे,गजानन शिंदे,सरपंच विठ्ठल मोहिते,ज्येष्ठ नेते वि म शिंदे गुरुजी,संदीप बोऱ्हाडे, माजी सरपंच रामभाऊ शिंदे, संदीप आगळमे, प्रकाश आगळमे, किशोर सातकर, सरपंच विजय सातकर, पूनम सातकर, दत्तोबा चोपडे,राजू लालगुडे, भाऊ लालगुडे,सागर येवले, मुकुंद लालगुडे इत्यादी मान्यवर तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.