Vadgaon : मावळ तालुक्यात तीन ठिकाणी कोविड १९ केअर सेंटर सुरू : तहसीलदार मधुसूदन बर्गे

२५ रुग्णालयात आयसोलेशन सेंटर ; १९ रुग्णवाहिका उपलब्ध

वडगाव मावळ – मावळ तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या देहूरोड शहरात नुकतेच दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनात वाढ करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून तालुक्यात तोलाणी इन्स्टिटयूट , समुद्र महाविद्यालय व कृषी पवन केंद्र अशा तीन ठिकाणी कोविड १९ केअर सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती वडगाव मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

या तिन्ही कोविड १९ केअर सेंटर मध्ये ९०० बेडची सोय करण्यात आली आहे. तसेच शासकीय ८ व खासगी १७ असे एकूण २५ रुग्णालयात आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. तातडीची उपाययोजना म्हणून तालुक्यात महाविद्यालयात व मंगल कार्यालय अशा ३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. या कामी तीन खासगी व १६ शासकीय आशा १९ रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे तहसीलदार बर्गे यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात अनेक गरजू नागरिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यासाठी लोणावळा, वडगाव, तळेगाव, कामशेत, आदी शहरात ६ शिबिरे सुरू असून याठिकाणी २४१ नागरिकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. कोणीही विनापरवाना असल्यास गुन्हा दाखल करावा. संकटकाळात तालुक्यात दवाखाना बंद ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी. मधुसूदन बर्गे : तहसीलदार, मावळ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.