Vadgaon Maval : शेतीसह शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती करा

एमपीसी न्यूज : शेतीसह एक तरी (Vadgaon Maval) शेतीपूरक व्यवसाय सुरू करून त्यातून शेतकरी बांधवांनी आर्थिक प्रगती करावी. पोल्ट्री हा त्यासाठी चांगला पर्याय आहे, असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी केले. वराळे येथील रूडसेड संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पोल्ट्री प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात दाभाडे बोलत होते.

यावेळी संस्थेचे संचालक प्रविण बनकर, स्थानिक संचालक सोनबा गोपाळे गुरूजी, प्रशिक्षक चंद्रकांत अपशिंगे, प्रा.प्रिया खरडेकर, मल्हारी कासवटे, प्रशिक्षक हरिष बावचे उपस्थित होते.

Chakan : करवाढीविरोधात चाकणकर आक्रमक; सर्वेक्षणात अनेक चुका

पोल्ट्री हा शेती पुरक जोडधंदा अतिशय किफायतशिर असून या व्यवसायातून चागंले उत्पन्न खात्रीने मिळू शकते. असे सांगून दाभाडे म्हणाले, की यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरीव अर्थ सहाय्य करेल, अशी ग्वाही संचालक माऊली दाभाडे यांनी यावेळी दिली.

रूडसेड संस्थेने मावळ तालुका (Vadgaon Maval) आणि पुणे जिल्ह्यातील उद्योजकांकरिता दहा दिवसाचे मोफत पोल्ट्री प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. समारोप प्रसंगी सर्व प्रशिक्षण घेतलेल्यांना प्रशस्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी केले होते. तर, हरिष बावचे यांनी आभार मानले. प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संदिप पाटील, योगीता गरुड, रवी घोजगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.