Vadgaon Maval: मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात 103 जणांनी केले रक्तदान

Vadgaon Maval: 103 people donated blood in Maval taluka NCP camp

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 103 रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

वर्धापन दिनानिमित्त वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या शुभहस्ते ध्वजरोहण करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुनिल आण्णा शेळके, बापूसाहेब भेगडे, बाबुराव वायकर, सुभाषराव जाधव, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, अर्चनाताई घारे, किशोर भेगडे, वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, सचिन घोटकुले, दीपक हुलावळे, गणेश काकडे, सुवर्णा राऊत, वैशाली दाभाडे, शोभा कदम, हेमलता काळोखे, तुकाराम ढोरे, सुनील दाभाडे, जीवन गायकवाड, तानाजी दाभाडे, कैलास गायकवाड, अशोक घारे, महादूबुवा कालेकर, बाळासाहेब कडु, काळुराम मालपोटे पक्षाचे सर्व नगरसेवक,सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या या संकटात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार सुनील आण्णा शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मावळ तालुक्यात रक्तदान शिबिरात आमदार शेळके यांनी प्रथमतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. आधार ब्लड बँक, पुणे यांच्या सहकार्याने या सर्व रक्तदात्यांची तपासणी करून 103 रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व मेडिकल किट देण्यात आले. सर्व नागरिक रक्तदात्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रसंगी आमदार सुनील शेळके व तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कुडे, विशाल वहिले, अतुल राऊत, आफताब सय्यद, प्रवीण ढोरे, मंगेश खैरे,  नगरसेवक चंद्रजित वाघमारे, शारदा ढोरे, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पूजा वहिले, पुनम जाधव, सोमनाथ धोंगडे, भाऊसाहेब ढोरे, शैलेश वहिले, गणेश म्हाळसकर, गणेश बरदाडे व कार्यकर्ते यांनी केले.

प्रास्ताविक सुभाषराव जाधव यांनी केले तर आभार राजेंद्र कुडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.