BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon maval : लेडी बॅमफर्ड चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत बधलवाडीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन वर्ग खोल्यांचे उद्‌घाटन

22
PST-BNR-FTR-ALL


एमपीसी न्यूज – जेसीबी – सीएसआर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या लेडी बॅमफर्ड चॅरिटेबल ट्रस्ट (एल बी सी टी) मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बधलवाडी येथे सुमारे 25 लाख रुपये  खर्चून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.

हे उद्‌घाटन जेसीबी इंडिया प्रा. लिचे विश्वस्त गगपल्लीवर, खांडेकर, मावळ तालुका गट शिक्षण अधिकारी वाव्हळ, व नवलाख उंब्रेचे विद्यमान सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच आबाजी बधाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम बधाले, उपाध्यक्ष  गबाजी दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एलबीसीटीचे समन्वयक संतोष सिरशिकर, मनीषा सावळगी,  संदीप भोसलकर, उपसरपंच महेश शिर्के, रवींद्र कडलक, संदीप शेटे, पंडित दहातोंडे, अनिल बधाले, गुलाब बधाले, सह सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जातात व यापुढेही राबवले जातील, असे मत गगपल्लीवर सर यांनी व्यक्त केले. भौतिक सुविधांच्या पूर्ततेबरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी विशेष योगदान द्यावे, म्हणजे इतर कंपन्यांचेही सहकार्य मिळेल, असे मत मावळ गट शिक्षण अधिकारी वाव्हळ मॅडम यांनी मांडले. त्याचबरोबर एलबीसीटीच्या कार्याचेही कौतुक केले.

एलबीसीटी मार्फत पुरवण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा व शैक्षणिक उपक्रमांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना भरपूर फायदा मिळत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ दिसत असल्याचे मत सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन एल बी सी टी प्रकल्प अधिकारी, संदीप भोसलकर, मुख्याध्यापक सूर्यवंशी मॅडम व शिक्षक, शा.व्य. समिती यांनी केले तर आभार उपसरपंच महेश शिर्के यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.