Vadgaon Maval : अर्थसंकल्पात तालुक्याला 350 कोटींचा निधी

एमपीसी न्यूज – यावर्षीच्या अर्थसंकल्पात 2023-24 मध्ये हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत 350 कोटी पर्यंत मावळ तालुक्यातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. (Vadgaon Maval) पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने 51 कोटी 63 लक्ष 14 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असुन मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगित झालेल्या विकास कामांना या सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली. 

येथे आयोजित पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,मोर्चाचे जिल्हा कार्याघ्यक्ष बाळासाहेब घोटकुले आदी उपस्थित होते.

बाळा भेगडे यांनी सांगितले की सुदुंबरे येथील जगनाडे महाराज समाधी स्थळासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तसेच मावळातील गड किल्ले संवर्धन व संगोपनासाठी (Vadgaon Maval) जिल्हा नियोजन समितीच्या वतीने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Talegaon Dabhade : सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी सुरू केले बेमुदत उपोषण

महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगिती दिलेल्या कामांना निधी देवुन गती देण्याचे काम करणार असुन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी 11 कोटी निधी, लोणावळा व वडगाव नगरपंचायतसाठी प्रत्येकी 10 कोटी निधी मंजूर झाला आहे तसेच वडगाव येथील प्रशासकीय इमारत,कान्हे व  लोणावळा येथील रुग्णालये,तलाठी कार्यालये,रस्ते व पुल आदी कामांना निधी पुरवून काम सुरु ठेवणार असल्याचे सांगुन मंत्री असताना पुनर्वसन वसाहतीसाठी जीआरला महाविकास सरकारच्या काळात स्थगिती दिली व 17 कोटी रुपये स्थगिती उठवुन सरकारने निधी मंजूर केला आहे.

आंबळे एमआयडीसी टप्पा क्र 4 साठी 32/1 ची परवानगी राज्यसरकारने मंजुरी दिली असुन सरकार बदलामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर 150 कोटी रुपयांचे वाटप शेतक-यांना करण्यात आले तसेच पंतप्रधान योजना आवास योजना अंतर्गत 15 हजार घरे होणे अपेक्षित होते परंतु (Vadgaon Maval) महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंजुर होणे अपेक्षित होते तसे झाले नाही आता 8 महीन्यात 1100 घरकुलांचे वाटप खाण्याचा आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.