Vadgaon Maval: विविध गुन्ह्यातील 6 गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार

Vadgaon Maval: 6 accused in various crimes deported for one year पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, पुणे व पिपंरी चिंचवड आयुक्तालय, मुळशी व खेड आदी हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्हातील सहा गुन्हेगारांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मुळशी व खेड आदी हद्दीतून हद्दपार केले असल्याची माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.

वडगाव पोलीस ठाण्यातील मंगेश भीमराव मोरे (वय २५, रा वडगाव (टोळीप्रमुख), विशाल उर्फ मोग्या तानाजी मोढवे (वय १९, रा.वडगाव मावळ), आकाश अंकुश चिमटे (वय १९, रा. कुसवली, ता मावळ), मयुर उर्फ चन्या बजरंग मोढवे (वय २४ रा. वडगाव), निखिल भाऊ काजळे (वय १९ रा. वडगाव), संभाजी दत्तात्रय भिलारे (वय २० रा. वडगाव, ता. मावळ) या गुन्हेगारांना तड़ीपार करण्यात आले आहे.

यांची सहा जणांची टोळी असून दहशत निर्माण करुन आर्थिक फायद्यासाठी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, हाणामारीसह दुखापत अशासारखे गुन्हे ही टोळी मावळमध्ये करीत असून त्याला व्यावसायिक स्वरुप दिले आहे.

त्यामुळे बरीच बेरोजगार मुले या टोळीतील गुन्हेगारांना मिळणाऱ्या कष्टाविना पैशामुळे वाईट प्रवृत्तीकडे आकर्षित झाली आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे नुकसान होत असल्याने या कृत्यांना आळा बसावा यासाठी या सहा गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हे सहा जण हद्दपार केलेल्या क्षेत्रामध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.