Vadgaon Maval : नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी कन्या नारायणी हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेची शाळा घेतली दत्तक

एमपीसी न्यूज – नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची कन्या नारायणी हिच्या वाढदिवसानिमित्त वडगाव केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळा एक वर्षाकरीता दत्तक घेतली आहे. याद्वारे समाजात एक चांगल्या शिक्षणासाठी, आपुलकीची भावना, कर्तव्य म्हणून काम करणार आहे. यासाठी ढोरे यांनी शाळेस सुरुवातीस 12,000 /- रुपयांचा धनादेश मुख्याधिपिका सुषमा घोरपडे, शिक्षका मंजुश्री तळपे, प्रीती तायडे, छाया जाधव यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द केला.

यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिपिका,शिक्षका, स्थानिक महिला भगिनींनी नारायणीस औक्षण करून ढोरे कुटुंबाचा सत्कार सन्मान केला.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले, वडगाव शहरामध्ये सामान्य कुटुंबातील मुले माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असल्याने येणाऱ्या कालावधीत वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या वतीने तसेच विविध सामाजिक संस्थाच्या सहकार्याने शहरातील सर्व 12 अंगणवाडी केंद्र आणि माध्यमिक शाळा सुधारण्यासाठी विशेषत प्रयत्न करणार आहे. सुरुवातीच्या काळात केशवनगर येथील जि. प. शाळेसाठी एका वर्षाभरात लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा एक वर्षाच्या आत उपलब्ध करून देऊ, त्याकरिता सर्वांचे विशेष सहकार्य लाभावे, असे आश्वासन देतो. तसेच मी सर्वांचे तसेच आयोजक जिल्हा परिषद शाळेचे विशेष आभार मानतो.

यावेळी कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजित वाघमारे उद्योजक सुनील शिंदे,राजेश बाफना,शरद ढोरे,माजी.ग्रा.पं सदस्य प्रविण ढोरे,अशोक घुले तसेच शिक्षकवर्ग ,पालक,महिला भगिनी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.