Vadgaon Maval : आरती म्हाळसकर यांची उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदी निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये वडगाव (Vadgaon Maval) येथील आरती अर्जुन म्हाळसकर यांची उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबाबत विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. म्हाळसकरवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत आरती अर्जुन म्हाळसकर यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नुकताच राज्यात निकाल जाहीर झाला यामध्ये मावळ तालुक्यातील वडगाव शहरांमधील सौ आरती अर्जुन म्हाळसकर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून महाराष्ट्र राज्य शासन उत्पादन शुल्क PSI पदावर आपले नाव कोरले आहे.

म्हाळसकर परिवारातील आदर्श सुनबाई ठरलेल्या आरती यांच्या यशामुळे परिवार व नातेवाइकांमध्ये मोठे आनंदी वातावरण पाहायला मिळत असताना काल याचेच औचित्य साधून म्हाळसकर परिवाराच्या वतीने आरती अर्जुन म्हाळसकर यांचा कौतुक व गुणगौरव सोहळा म्हाळसकरवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.

Pune : महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर शाखेने केले महिलेचे जट निर्मूलन

याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली (Vadgaon Maval) उपस्थिती लावत आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना दिल्या यावेळी भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,बडवे इंजिनीअरिंगचे संचालक गंगाधर जपे,पवना हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.वर्षा वाढोकर, ॲड शैलेश घारे,माजी अध्यक्ष भाजपा युवती राणी म्हाळसकर, सुरेश जाधव, ॲड.विजय जाधव, यदुनाथ चोरघे तसेच आदि जण उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन मावळ मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, नगरसेविका सौ सायली म्हाळसकर, अरुण म्हाळसकर,राहुल म्हाळसकर, संतोष म्हाळसकर यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी, तानाजी तोडकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.