Vadgaon Maval: 4 महिन्यांपासून फरार असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक

Vadgaon Maval: Accused arrested in rape case who was absconding for 4 months पीडित फिर्यादी महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून अतिप्रसंग केला. लग्न न करता फसवणूक केल्याचा गुन्हा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

एमपीसी न्यूज- पोलिसांना चार महिन्यांपासून गुंगारा देणारा बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला सोमवार (दि.27) पहाटे 3 वा. अटक केली. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने गुरुवार (दि.30) पर्यंत पोलीस कोठडी दिली.

ज्ञानेश्वर गेनूभाऊ कल्हाटकर (वय 24 रा. कल्हाट ता. मावळ) असे बलात्कार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित फिर्यादी महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून अतिप्रसंग केला. लग्न न करता फसवणूक केल्याचा गुन्हा (दि.11 मार्च 2020) रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

आरोपी सलग चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्हाटकर मावळ हद्दीत आल्याची माहिती मिळाली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई व कर्मचारी दीपक गायकवाड यांनी सापळा रचून आरोपीला कल्हाट येथे अटक केली.

सोमवार दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपी कल्हाटकर याला गुरुवार (दि.30) पर्यंत पोलीस कोठडी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.