Vadgaon Maval: आदिवासी पाड्यांवर उबदार कपड्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आंदर मावळातील आदिवासी पाड्यांवर उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. सध्या थंडीचा जोर वाढला आहे,  कुडाच्या झोपडीत राहणाऱ्या आदिवासींची कुटुंबीय या थंडीत गारठत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी एका दानशूराने ही मदत केली आहे.

आंदर मावळाच्या कुसवलीतील शंकरवाडी, वाहनगाव, वडेश्वर व माऊतील कातकरी वस्तीतील सुमारे शंभर कुटुंबांना ही मदत करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पालीचे वसंत ओसवाल यांनी ही मदत दिली. पोलीस पाटील अतुल असवले, बाबूलाल ओसवाल, ललित ओसवाल, पांडुरंग हिलम, बजरंग हिलम, राजू हिलम, सोमनाथ हिलम उपस्थित होते.

ललित ओसवाल म्हणाले की, आदिवासी पाड्यांतील गरजू नागरिकांची गरज पाहून ही मदत करण्यात आली. विशेषत: लहान मुला-मुलींना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट उपयुक्त ठरतील.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामदास वाडेकर म्हणाले,  कुडामेढाच्या घरात थंडीने कुडकुडत बसणारी अजून अनेक कुटुंबे आहेत. समाजातील दानशूरांनी मदत केली तर त्याचा गरिबांना फायदा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.