BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval: अ‍ॅड. तुकाराम काटे यांची वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ बार असोसिएशनचे सन 2019-2020 या वर्षाच्या कार्यकारणीच्या निवडीसाठी सोमवारी (दि. 17 रोजी) चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अ‍ॅड. तुकाराम पंढरीनाथ काटे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या पॅनलमधील उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. त्यामुळे वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुकाराम काटे यांची निवड करण्यात आली आहे.

अ‍ॅड. तुकाराम काटे यांच्या पॅनलमधील एकूण सर्व उमेदवार निर्विवाद वर्चस्व राखत निवडून आले. खजिनदार पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. दोन्ही उमेदवारांच्या संमतीने समान कालावधी करीता या पदाचा कार्यभाग स्विकारण्याचे ठरले आहे.

  • वडगाव मावळ न्यायालयाचे आजी-माजी पदाधिका-यांतर्फे सर्व नवनियुक्तीक कार्यकारणी सभासदांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. रविंद्र दाभाडे यांनी काम पाहिले.

  • वडगांव मावळ बार असोसिएशनची सन 2019 -2020 ची नवनियुक्तिक कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-

अध्यक्ष- अ‍ॅड.तुकाराम पंढरीनाथ काटे
उपाध्यक्ष- अ‍ॅड. सुरेंद्र जयवंतराव दाभाडे
सचिव- अ‍ॅड.महेंद्र महादु खांदवे
सचिव- अ‍ॅड. जयश्री शहाजी शितोळे
खजिनदार- अ‍ॅड. दिपक विष्णूकांत वाकडे, अ‍ॅड. प्रफुल्ल वंकटलाल लुंकड़
सदस्य- अ‍ॅड. अमोल रघुनाथ दाभाडे, अ‍ॅड. सुभाष परशुराम तुपे, अ‍ॅड. सुपिया सोपान तिखे, अ‍ॅड. विदुला नंदकुमार वर्तक, अ‍ॅड. विश्वनाथ सुदाम जाधव,
अ‍ॅड. संकेत सदाशिव शिंदे.

HB_POST_END_FTR-A1
.