Vadgaon Maval : अंगणवाडीत गर्भवती, स्तनदा मातांना पोषकवडीचे वाटप

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत -समृद्ध भारत – सुदृढ बालक यासाठी सुरू झालेल्या THR (टेक होम रेशन) या योजनेंतर्गत वडगांव मावळ येथील चव्हाण वाडा येथे असलेल्या अंगणवाडीत गर्भवती आणि स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील बालकांसाठी गहू, चवळी, मसुरदाळ, तेल, मीठ, मिरची,हळद आणि पोषकवडीचे वाटप करण्यात आले.

स्त्रियांना प्रसूतीपूर्व घेण्यात येणाऱ्या सकस आहाराचा यांत समावेश आहे. जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण नसावे, ही बालके सुदृढ असावीत म्हणून शासनाने स्थानिक अंगणवाडी, पदाधिकारी, अधिकारी, विविध सामाजिक संस्था इत्यादिंच्या सहकार्याने ही योजना सुरू केली आहे.

  • याप्रसंगी नगरसेवक प्रवीण चव्हाण, माया चव्हाण, चंद्रजित वाघमारे, ज्येष्ठनेते वसंतराव भिलारे, लायन्स क्लबचे जिल्हा प्रतिनिधी भूषण मुथा, विकी म्हाळसकर तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेविका माया चव्हाण यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. अंगणवाडी शिक्षिका कल्पना ढोरे आणि मदतनीस आशा राऊत यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.