Vadgaon Maval : अपंग कल्याण निधीतून दिव्यांग बांधवांना चार लाख दहा हजार रुपये निधीचे वाटप

एमपीसी न्यूज – वडगाव नगर पंचायतमध्ये  (Vadgaon Maval) अंध अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या 82 लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले. नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. नगरपंचायतच्या उत्पन्नाच्या तीन टक्के अंध अपंग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे, त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे.

वडगाव नगरपंचायत सन 2022/ 2023 मधील उत्पन्नाच्या 3% अंध अपंग कल्याण निधी अंतर्गत नगरपंचायतमध्ये सन 2023 मध्ये नोंदणी केलेल्या 82 लाभार्थ्यांना नगरपंचायत कार्यालयात प्रत्येकी रुपये 5000/- रुपयांचा धनादेश नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, मंगेश खैरे, वडगाव नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

Pune : महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी आणि प्रमाणन केंद्र दिवे घाटावर होणार

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने अपंग कल्याण योजनेतून आज शहरातील जवळपास 82 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे सुमारे 4 लाख 10 हजार रुपये त्यांच्या बँक (Vadgaon Maval) खात्यात जमा करण्यात आले.

यावेळी दिव्यांग लाभार्थी यांना संबोधित करताना नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी आवाहन केले की, आपल्या शहरातील जवळपास राहणारे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांनी येणाऱ्या कालावधीत वडगाव नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधून या योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी व संबधित लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.