Vadgaon Maval : पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आशिष ढोरे

एमपीसी न्यूज- इंदोरी मावळ येथील माजी उपसरपंच आशिष विठ्ठल ढोरे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी निवड जाहीर केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र ढोरे यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, माजी सरपंच दिलीप ढोरे,प्रशांत भागवत आदी उपस्थित होते.

ढोरे हे कुशल संघटक असून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदर मावळ पूर्व विभागाचे अध्यक्षपद भूषविले असून इंदोरी येथील श्री धर्मनाथ महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.