Vadgaon Maval : वकिलांवरील हल्ल्याचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे निषेध

एमपीसी न्यूज- दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात वकिलांवर हल्ला झाल्याचे पडसाद वडगाव मावळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात उमटले असून, वडगाव मावळ बार असोसिएशनने काळ्या कोटावर लाल फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला. अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुकाराम काटे यांनी दिली आहे.

दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून वकिलांवर गोळीबार आणि मारहाणीची घटना घडली होती. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. राज्यातील विविध बार कौन्सिलच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. वडगाव मावळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात देखील कामकाजाच्या दरम्यान वडगाव मावळ बार असोसिएशनने काळ्या कोटावर लाल फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बार असोसिएशनचे सचिव अॅड महेंद्र खांदवे, अॅड जयश्री शितोळे, अॅड संजय वांद्रे, अॅड. रवींद्र यादव, अॅड रंजना भोसले, अॅड गणेश शिराळकर, अॅड वाय पी गोरे, अॅड प्रताप शेलार, अॅड शैलेश घारे, अॅड. चेतन जाधव, अॅड. सुधा शिंदे तसेच वडगाव मावळ बार असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.