Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी अतुल राऊत

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी वडगाव मावळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड करण्यात आली. वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी (दि 21) फेब्रुवारी मावळ तालुका काँग्रेस पार्टी आयोजित ओबीसी सेल कार्यकर्ता मेळाव्यात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी राऊत यांना नियुक्तीपत्र दिले.

यावेळी मावळ निरीक्षक विजय दादा कोलते पाटील, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, माजी सभापती गणपतराव शेडगे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मु-हे, नगरसेवक संतोष भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, युवक कार्याध्यक्ष सुनील नाना भोंगाडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, ओबीसी महिला अध्यक्षा संध्या थोरात, हवेलीच्या सभापती हेमलता काळोखे, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत आदी प्रमुख उपस्थितीत होते.

राऊत हे मावळ डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक,स्व पै केशवराव ढोरे प्रतिष्ठान संचालक, मावळ विचार मंचचे अध्यक्ष, स्मित कला रंजन या संस्थेचे अध्यक्ष, मावळ सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आणि बालविकास मित्र मंडळ सक्रिय सदस्य आहेत. मावळ तालुक्यातील शैक्षणिक, कला, क्रीडा , सांप्रदायिक,सहकार व सामाजिक संस्थाशी ते संबंधित असून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.