Vadgaon Maval : अविनाश बवरे यांची सलग तिसऱ्यांदा पुणे जिल्हा भाजप सरचिटणीसपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील भाजपाचे निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश बवरे यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. बवरे हे कुशल संघटक आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असणारे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात.

पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी बवरे यांची नियुक्ती जाहीर केली असून कामगार,पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे व खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

बवरे हे जिल्हा नियोजन विकास समितीचे विद्यमान सदस्य असून याआधी त्यांनी पक्षसंघटनेत तालुका व जिल्हा पातळीवर सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्याचबरोबर तालुका प्रभारी म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवून त्या पदाला योग्य न्याय त्यांनी दिला आहे. पक्षाचे संघटनमंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय विधानसभा, लोकसभा निवडणुकीत यशस्वी प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे.

आगामी काळात पक्षाची ध्येय,धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.