Vadgaon Maval : न्यायालय परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती

0

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे वडगांव मावळ न्यायालय परिसरात जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहे.

तसेच न्यायालय परिसराची आज पेस्ट कंट्रोल करून स्वछता करण्यात आली. पक्षकार,वकील, कोर्ट कर्मचारी,पोलीस, न्यायाधीश यांना रुमाल वाटण्यात आले.

यावेळी अ‍ॅड.विठ्ठल पिंपळे, अ‍ॅड. धनंजय कोद्रे, अ‍ॅड. दीपक चौधरी, अ‍ॅड. सोमनाथ पवळे, अ‍ॅड. अभिषेक गोडाबे, अ‍ॅड. मूनफ शेख, अ‍ॅड. संतोष गुंजाळ, अ‍ॅड. अजित वहिले, अ‍ॅड. राकेश वहिले, अ‍ॅड. स्वामी फुगे यांनी विशेष सहकार्य केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like