Vadgaon Maval : बाफना डि.एड कॉलेजचे पुणे जिल्हा कला, क्रीडा स्पर्धेत यश

एमपीसी न्यूज – डायट पुणे यांच्या वतीने पुण्यात पुणे जिल्हा कला, क्रीडा सपर्धा दि. 16 जानेवारी 2020 ते 22 जानेवारी 2020 दरम्यान आयोजित केल्या होत्या. वडगाव मवाळच्या हरकचंद रायचंद बाफना डिएड कॉलेजने विविध क्रीडा प्रकारात नेत्रदीपक यश मिळवले.

कलेत पीपीटी प्रथम, वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय, तर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. सांघिक प्रकारात कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक मदन बाफना,अध्यक्ष तुकाराम असवले,सचिव अशोक बाफना यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.