Vadgaon Maval : जय मल्हार ग्रुपतर्फे हैद्राबाद ते वडगाव मावळ शिवज्योत आणून शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज- हैद्राबाद ते वडगाव मावळ असे 700 की मी चे अंतर सायकलवर पार करून शिवज्योत आणण्यात आली. शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राच्या बाहेर देखील साजरी व्हावी व शिवरायांच्या आचार विचाराचे बीज हे महाराष्ट्राबाहेर रुजवावे म्हणून जय मल्हार ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

हैद्राबाद येथील मराठा भुवन येथे जंगी स्वागत करण्यात आले व त्यानंतर गोवळकोंडा किल्ल्यावर शिवज्योत प्रज्वलित करून सायकलने हा प्रवास करण्यात आला. अध्यक्ष सोनू पिंजण, संतोष देशमुख, अशोक ढोरे, राजू शिंदे, तुषार हुलावळे या पाच जणांनी ७००किमी चा टप्पा चार दिवसात पार केला. कार्यक्रमाचे नियोजन तुषार वहिले मंगेश खैरे यांनी केले होते.

जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाषभाऊ जाधव,माजी उपसरपंच विशाल वहिले, संतोष खैरे, गणेश वायकर, रोहित गिरमे, सचिन हिरे व आदींनि विशेष सहकार्य केले. जय मल्हार ग्रुपच्या महिला सभासद नगरसेविका पूजा वहिले, प्रियांका खैरे, कीर्ती वहिले आदींच्या वतीने शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बाल कलाकारांनी शिवाजी महाराज, जिजाबाई, सईबाई व मावळे यांची वेशभूषा केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.