Vadgaon Maval : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी- भाजपची मागणी

BJP demands immediate help to farmers affected by Nisarga cyclone

एमपीसीन्यूज – खरीप हंगाम सुरु होऊनही पीककर्ज वाटप ठप्प आहे. शेतकरी कर्जमाफी अर्धवट झालेली आहे. बांधावर खत वाटप योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. आधीच कोरोना महामारीमुळे पुरता हवालदिल झालेला शेतकरी निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. चक्री वादळात नुकसान झालेल्या मावळातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजप तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने करण्यात आली आहे.

निसर्ग चक्री वादळात मावळमधील फ्लोरिकल्चर व शेतकरी व आदिवासी बांधव यांचे खूप मोठ्याप्रमाणावर नुकसान होऊनही महाराष्ट्र सरकारने भरीव नुकसानभरपाई किंवा मदतीची कुठलिही घोषणा अजून केलेली नाही.

या शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई, नवीन पीककर्ज वाटप व शेतकरी कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरीत कार्यवाही होऊन मदत मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यावेळी भाजपचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, कार्याध्यक्ष महेंद्र रामचंद्र पळसे, किसान मोर्चा अध्यक्ष अजय निवृत्ती भेगडे, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस रविंद्र भोसले, विनायक भेगडे,रजनी ठाकूर, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय भेगडे, महिला मोर्चा कार्याध्यक्षा अश्विनी काकडे, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित,संजय जाधव, सचिन आरते, गणेश भेगडे, आशुतोष हेंद्रे,ओबीसी आघाडी अध्यक्ष नितीन पोटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, कायदा आघाडी अध्यक्ष ॲड नितेश नेवसे, महिला मोर्चा सरचिटणीस मीना अजय भेगडे, सचिव रुपाली दिपक भेगडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर हि.भेगडे, भाजपा नेते नाथा घुले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.