Vadgaon Maval: भाजपच्या वतीने नगरपंचायत हद्दीतील गरजू कुटुंबांना ‘रेडी टू कूक’ किटचे वाटप

वडगाव मावळ – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्ष्मण रेषा न ओलांडण्याच्या अर्थात घराबाहेर न पडण्याच्या आवाहनाला अनुसरून भारतीय जनता पार्टी – वडगांव शहर, युवा मोर्चा, महिला आघाडी, व्यापारी आघाडी , विद्यार्थी आघाडीच्या वतीने ‘कर्तव्य नव्हे जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत  वडगाव नगरपंचायत हद्दीतील गरजू कुटुंबांना ‘रेडी टू कूक’ किटचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक गरजूंना त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत असताना वडगांव नगरपंचायत परिसरातील गरजू कुटुंबांना अंदाजे आठ दिवस पुरेल अशा ‘रेडी टू कूक’ पदार्थांचे किट तयार करण्यात आले असून सुमारे 350 कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये पौष्टिक मसाले भात/ दाल खिचडी मिश्रण किट, चहा, साखर आणि दूध पावडर किट, पारले बिस्कीट पॅकेट्स आणि कांदे बटाटे असे एकत्रित किट असून नागरिकांनी केवळ पाणी गरम करून त्यामध्ये वरील मिश्रण एकत्र केल्यास केवळ 15 मिनिटांमध्ये पौष्टिक मसाला भात / दाल खिचडी तयार होणार आहे. या मिश्रणात त्यांना काहीही टाकावयाचे नाही. या नावीन्यपूर्ण योजनेमुळे अनेकांचा गरजू नागरिकांसोबत डबे वाटण्यामुळे होणारा दररोजचा थेट संपर्क मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तसेच संबंधित गरजू बांधव देखील हे किट मिळाल्यामुळे पुढील काही दिवस घराबाहेर पडणार नाहीत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करुन वाटप करण्यात आले.

मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकात बोलतांना भास्करराव म्हाळसकर यांनी किमान संपर्क साधून जास्तीत जास्त कार्य व्हावे, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत याचा लाभ मिळावा आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले. प्रमुख उपस्थिती लाभलेले वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रामनाथ वारींगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

वडगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचे ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे, बाळासाहेब कुडे ,सोमनाथ काळे, पंढरीनाथ भिलारे, डॉ.सुनील बाफना , शहराध्यक्ष किरण भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळसकर, शहर सचिव रविंद्र म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण , गटनेते दिनेश ढोरे ,अॅड. विजयराव जाधव, किरण म्हाळसकर , शामराव ढोरे , दिलीप म्हाळसकर, मावळ तालुका क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, माजी  सरपंच नितीन कुडे ,माजी उपसरपंच सुधाकर ढोरे,पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, राणीताई म्हाळसकर , बाळासाहेब भालेकर, रविंद्र काकडे , शंकर भोंडवे , गणेश भेगडे ,खंडूशेठ भिलारे ,संतोष म्हाळसकर, दिलीप रा. चव्हाण ,संदीप म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर , दीपक भालेराव , प्रमोद म्हाळसकर , शेखर वहिले ,योगेश म्हाळसकर ,मयूर भोईटे, शरद मोरे , विराज हिंगे , मनोज गवारी , प्रशांत चव्हाण , महेश म्हाळसकर ,आकाश वारुळे ,निखील तारू आदी उपस्थित होते

या नावीन्यपूर्ण योजनेबाबत येथील व्यापारी बांधव सुभाषचंद्र मुथा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वागत वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे यांनी केले. किटबाबत माहिती कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे यांनी दिली. सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी केले. आभार रमेश ढोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.