Vadgaon Maval : भाजपच्या वतीने ‘कोरोना विषाणू’ प्रतिबंधबाबत माहितीपत्रकांचे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी वडगांव शहर/युवा मोर्चा, महिला आघाडी, व्यापारी आघाडी, विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने कोरोना (कोविड 19) या आजारावर “कोरोना “- काळजी करू नका – सावध रहा – लक्षणे दिसल्यास उपचार घ्या – निरोगी रहा. याबाबत माहिती देणारे जनहितार्थ पोस्टर्सचे सामूहिक प्रकाशन आणि माहितीपत्रक वाटप रविवार (दि. 15 मार्च 2020) ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात करण्यात आले.

कोरोना व्हायरसची लक्षणे, बचावासाठी करावयाची उपाययोजना तसेच घ्यावयाची काळजी यांचे सुटसुटीत शब्दांत माहिती या पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. वडगांव येथील सर्व वर्तमानपत्रे , सोशल मिडिया , स्टिकर्स या द्वारे ही जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी पंचायत समिती मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , शहराध्यक्ष किरण भिलारे , रमेश ढोरे , भूषण मुथा , प्रसाद पिंगळे , रविंद्र म्हाळसकर, नगरसेवक अॅड.विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, संभाजीराव म्हाळसकर , सुधाकर ढोरे ,अनंता कुडे, रविंद्र काकडे , शंकर भोंडवे , दत्ता निम्हण , संदीप कल्हाटकर , बाळासाहेब थरकूडे तसेच ज्येष्ठ नागरिक , महिला भगिनी आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.