Vadgaon Maval: कोरोना योद्धांचा भाजप महिला आघाडीच्या वतीने सत्कार

Vadgaon Maval: BJP felicitates Corona Warriors पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले.

एमपीसी न्यूज- मावळ तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून गावपातळीवर कोरोनाच्या संकटात काम करणा-या आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी आदींचा सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणा-या आरोग्य कर्मचारी, पोलीस अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

राखी बांधून आदरभाव व्यक्त करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. सरचिटणीस स्मिता म्हस्के यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

शिवणे येथे झालेल्या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, ज्येष्ठ नेते माजी सभापती एकनाथराव टिळे, पोलीस पाटील रमेश दळवी, पवन मावळ भाजपाचे अध्यक्ष धनंजय टिळे, कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, सरचिटणीस सारिका शिंदे, उपाध्यक्ष कल्याणी राक्षे, उपाध्यक्ष रोहिणी गाडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.