Vadgaon Maval : भाजप शहर पदाधिकाऱ्यांची निवड

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पक्ष वडगाव शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी धनश्री शंकरराव भोंडवे, वडगांव शहर भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी रमेश नारायण ढोरे तर भूषण सुभाषचंद्र मुथा यांची भारतीय जनता पक्षाच्या वडगांव शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर, महिला अध्यक्षा नंदा सातकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, किरण राक्षे, यूवक अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, युवती अध्यक्षा राणीताई म्हाळसकर, माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, वडगांव शहराध्यक्ष किरण भिलारे, उपनगराध्यक्षा अर्चनाताई म्हाळसकर, प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, सरचिटणीस यदूनाथ चोरगे तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक, मावळ तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.