Vadgaon Maval: लायन्स क्लब आयोजित रक्तदान शिबिरात 93 जणांचे रक्तदान 

Vadgaon Maval: Blood donation of 93 people in the blood donation camp organized by Lions Club

एमपीसी न्यूज – कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने शासनाने रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना रक्त पुरवठा करावा असे आव्हान केले होते. लायन्स क्लब ऑफ वडगाव व मनीषा मॅटर्निटी होम यांनी रविवार दि. 17/05/2020 रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 93 रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फुर्त प्रतिसाद दिला. 

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी स्व:ता रक्तदान करून शिबिराचेउद्​घाटन केले व तालुक्यातही लायन्स क्लब प्रमाणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन केले. प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक तथा आरोग्यसभापती राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, सुनिल ढोरे, चंद्रजित वाघमारे, किरण म्हाळस्कर, संतोष म्हाळस्कर, संस्थापक अध्यक्ष अॅड दामोदर भंडारी, विद्यमान अध्यक्ष सुनीत कदम, डॉ. नेमीचंद बाफना, प्रकल्प प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळासाहेब बोरावके, गुलाबर म्हाळस्कर, जितेंद्र रावळ, अमोल मुथा, आदिनाथ ढमाले,  नंदकिशोर गाडे, संतोष चेट्टी, संजय भंडारी, अॅड चंद्रकांत रावळ, योगेश भंडारी, झुंबरलाल कर्णावट, भुषण मुथा, दिलीप मुथा आदी उपस्थित होते.

रक्तदान करण्यात पहिल्यांदा रक्तदान करणारे युवक व कामगार वर्गाचे प्रमाण अधिक होते. सगळीकडे चिंताजनक स्थिती असताना आणिबाणीच्या काळात लायन्स क्लब ऑफ वडगावने सुरवातीच्या अडचणीच्या काळात अन्नछत्र सुरू करून केलेल्या कार्याचे कौतुक करून अन्नछत्र हे मावळ तालुक्यात एक दिशादर्शक म्हणून उपयुक्त झाले व त्या पाठोपाठ रक्तदान शिबीर आयोजित करून समाजाला आवश्यक सेवा दिली. अशा उपक्रमाचे कौतुक तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले व यापुढे लायन्स क्लब ऑफ वडगाव आयोजित सर्व समाजोपयोगी कार्यास शासनाचे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन तहसीलदार बर्गे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.