BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : कान्हे, जांभूळ ग्रामपंचायतीची निवडणूक आठ डिसेंबरला

सहा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी पोटनिवडणूक

0

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कान्हे व जांभूळ या दोन ग्रुपग्रामपंचायतींचीं सार्वत्रिक निवडणूक व सहा ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या नऊ जागांसाठी पोटनिवडणूक 8 डिसेंबर रोजी होणार आहे. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमात मावळ तालुक्यातील कान्हे व जांभूळ या दोन ग्रुपग्रामपंचायतीसह सुदुंबरे व कुणे नामा येथील सरपंचपदासाठी तसेच सुदुंबरे येथील सदस्यांच्या चार जागा, साते, उढेवाडी, माळवाडी, आंबेगाव व खडकाळा येथील रिक्त असलेल्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

दि 16 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2019 – उमेदवारी अर्ज दाखल करणे.

22 नोव्हेंबर 2019 – अर्जांची छाननी.

25 नोव्हेंबर 2019 – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख.

8 डिसेंबर 2019 – मतदान.

9 डिसेंबर 2019 – मतमोजणी

HB_POST_END_FTR-A2

.