Vadgaon Maval : सेवा फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील सेवा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना विशेष कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामीण भागात वेगवेगळे विधायक उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले.

सेवा फाऊंडेशनचे संस्थापक ऋषीकेश सांडभोर, पी.एन.के.नायर, धीरज नायडू, राजू चोपडे, बाळासाहेब मालपोटे, तानाजी मोरे, किरण भांगरे, ज्ञानेश्वर ढोरे, निलेश जगताप उपस्थित होते.

संतोष जांभुळकर(योग प्रशिक्षक),ऋतिका शेळके (मृदुंगाचार्य ), शंकर साळुंखे ,सुधीर पाटील (एच. आर. व्हायब्रंट), डाॅ.विकेश मुथा (वैद्यकीय), रामदास वाडेकर (पत्रकारिता), संकेत जगताप (पत्रकारिता ), गणेश घोगरे (सामाजिक), रोहिदास असवले (सामाजिक) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चंद्रकांत असवले यांनी प्रास्ताविक केले. अनिल सातकर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश गुरव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.