Vadgaon Maval : पीडीसीसी बँक सेवक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी चंद्रकांत ढोरे

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक (Vadgaon Maval) सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.

पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनल व स्वामी समर्थ सहकार पॅनलमध्ये लढत झाली. मावळ गटातून सहकार परिवर्तनचे उमेदवार म्हणून चंद्रकांत ढोरे हे स्वामी(Vadgaon Maval) समर्थ पॅनेलचे उमेदवार गुलाबराव खांदवे यांचा 82 मतांनी पराभव करून विजयी झाले होते.

Talegaon Dabhade : खेळ मांडीयेला कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

दरम्यान, संस्थेच्या नुकत्याच झालेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमनपदी निलेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चंद्रकांत ढोरे हे जिल्हा बँकेच्या वडगाव मावळ शाखेत सेवेत असून श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त (Vadgaon Maval) म्हणून ते कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.