Vadgaon Maval: ‘राम मंदिर भूमिपूजन दिवशी नागरिकांनी घरात दीपोत्सव साजरा करावा’

Vadgaon Maval: 'Citizens should celebrate Dipotsav at home on Ram Mandir Bhumi Pujan day' श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ होत असून संपूर्ण देशभर हा दिवस सुवर्ण दिन म्हणून पाळला जाणार आहे.

एमपीसी न्यूज- अयोध्या येथे येत्या बुधवारी (दि.5) होणाऱ्या श्री राम मंदिर बांधकाम भूमिपूजन समारंभाच्या दिवशी नागरिकांनी मंदिरासह आपापल्या घरात दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर व सचिव अनंता कुडे यांनी केले आहे.

यासंदर्भात देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि 5 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ होत असून संपूर्ण देशभर हा दिवस सुवर्ण दिन म्हणून पाळला जाणार आहे.

त्यामुळे वडगावकर नागरिकांनी व बंधू भगिनींनी शहरातील सर्व मंदिरे व आपापल्या घरी दीपोत्सव साजरा करून या सुवर्ण दिनाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.