BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : सामुदायिक विवाह सोहळ्याच्या जागेचे भूमिपूजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी संप्रदाय यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 24 एप्रिल 2019 रोजी कान्हे फाटा येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. या निमित्त तेथील जागेचे आज (शुक्रवारी) माजी मंत्री मदन बाफना यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी अतिष परदेशी ,सुकनशेठ बाफना, हभप नंदकुमार भसे, राजू सातकर, राजेंद्र सातकर, ह.भ.प रविंद्र महाराज पंडित, ह.भ.प.शंकर महाराज मराठे, ह भ.प महादू कालेकर, हभप महादूबुवा सातकर, विलास मालपोटे, हभप बबन भानुसघरे, हभप सुखदेवमहाराज ठाकर, अनंता लायगुडे, किशोर सातकर, अनिल मालपोटे, अमोल शेटे, शंकर सुपे, शांताराम लष्करी व मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदाय,मावळ प्रबोधिनीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ प्रबोधिनीचे संस्थापक/अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी विवाह सोहळ्याची सर्व पुढील नियोजनाची माहिती सर्व उपस्थित मान्यवरांना दिली. या विवाहसोहळ्यासाठी 102 जोडप्यांची अधिकृत विवाह नोंदणी झाली आहे.

तालुक्यात गेल्या महिनाभरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुक्यातील 198 गावामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांसी विवाह सोहळ्याबाबत संवाद साधून माहिती देण्यात आली. त्यामध्ये 109 तरूण मंडळ , 162 महिला बचत गट, कंपनीचे कामगार यांनी स्वयंस्फूर्तीने सोहळ्यात काम करण्यासाठी आपली नावे संस्थेकडे दिली आहेत, अशी माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली. सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले. प्रास्ताविक रवी शेटे यांनी केले तर आभार रोहिदास महाराज धनवे यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2

.