Vadgaon Maval : दोन गटातील मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार; 11 जणांवर गुन्हा दाखल

Conflicting complaints in assault cases between two groups; Charges filed against 11 persons

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणांवरून दोन गटात झालेल्या भांडणात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्यानंतर 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री केशवनगर, वडगाव मावळ येथे घडली.

याप्रकरणी श्रेयश अशोक घारे (वय 23, रा. मधुबन कॉलनी वडगाव, ता. मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुलदिप ढोरे, पप्पु ढोरे, दिनेश ढोरे, गणेश ढोरे (सर्व रा. मधुबन कॉलनी वडगाव, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयश घारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केशवनगर येथील सिताळा देवीच्या मंदीरासमोर फिर्यादी यांना कुलदिप ढोरे याच्या वडिलांनी मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे मित्र बुधवारी रात्री पप्पू ढोरे याच्या घरी गेले होते.

त्यावेळी कुलदिप ढोरे, पप्पु ढोरे, दिनेश ढोरे, गणेश ढोरे यांनी फिर्यादी यांना ‘आमच्या घरी का आला’ असे म्हणून हाताने व लाकडी काठीने तसेच दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले आहेत.

याच्या परस्पर विरोधात जयदिप बाळासाहेब ढोरे (वय 27, रा. केशवनगर मधुबन कॉलनी वडगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रेयस घारे, सोन्या मोहिते, भो-या ढोरे, सुपेकर, गायकवाड, धडवले, फाटक (सर्व रा. मधुबन कॉलनी, केशव नगर वडगाव, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयदीप ढोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. 27) रात्री साडेआठ वाजता भांडणे सोडविण्याच्या कारणावरून श्रेयस घारे, सोन्या मोहिते, भो-या ढोरे, सुपेकर, गायकवाड, धडवले, फाटक यांनी काठ्या, लाकडी दांडके, पाईप घेऊन फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. घरात घूसून फिर्यादी त्यांचे आई-वडील आणि महिलांना शिवीगाळ दमदाटी केली. फिर्यादी यांना डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.