Vadgaon Maval : कुक्कुट पक्ष्यांचे संवर्धन मूल्य 15 दिवसात मिळावे

एमपीसी न्यूज – शेतीला जोडधंदा (Vadgaon Maval) म्हणून कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री कंपन्यांकडून संवर्धन मूल्य मिळण्यासाठी मोठ्ठा कालावधी लागतो. त्यामुळे हातावर पोट असणारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतात. मावळ तालुक्यातील पोल्ट्री कंपन्यानी आपल्या पोल्ट्री फार्मरचे संवर्धन मूल्य 15 दिवसात द्यावे, अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने पोल्ट्री कंपन्यांच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यात असलेल्या पोल्ट्री कंपन्यांच्या व्यवस्थापकांना भेटून ही मागणी केली. यावेळी राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, तालुका पोल्ट्री संघटनेचे सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, तक्रार निवारण समितीचे प्रमुख संभाजी केदारी हे उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. हा व्यवसाय शेतकरी पोल्ट्री कंपन्याबरोबर करार पद्धतीने करीत आहेत. मात्र, तालुक्यातील काही कंपन्या या शेतकर्‍याची अडवणूक व शोषण करीत आहेत.

Maval : जांभूळ व सांगवी जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट

काही कंपन्या फार्मरांना पक्षी वेळेवर देत नाहीत. काही कंपन्या पक्षाचे खाद्य (Vadgaon Maval) वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे पुरवत नाहीत. तसेच, वाढ झालेले पक्षी वेळेवर घेऊन जात नाहीत. काही कंपन्या 50 दिवसापर्यंत पक्षी सांभाळायला लावतात. तर, पक्षी नेल्यानंतर 30 ते 45 दिवस पेमेंट करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. या महत्त्वाच्या मागण्या कंपन्याच्या व्यवस्थापकांच्या पुढे मांडण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असून तालुक्यातील सर्व पोल्ट्री कंपन्यांना लेखी निवेदन देणार आहेत, असे संघटनेचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी सांगीतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.