Vadgaon Maval Corona Update :दिवसभरात 60 नवे कोरोनाबाधित,74 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ  तालुक्यात गुरुवारी (दि.22) 60 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात  दिवसभरात 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,  आतापर्यंत 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 499 आहे.

 

शहरी भागात 36 तर ग्रामीण भागात 24 रुग्ण गुरुवारी सापडले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 20  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले.

 

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 25518  झाली आहे. तर दिवसभरात 74  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वेहेरगाव 3, कामशेत, कान्हे, राजपुरी, भाजे, निगडे व इंदोरी प्रत्येकी 2, दहिवली, कुणे नामा, बेबड ओहळ, वाकसाई, शिरगाव, नाणे, कुसगाव बुद्रुक व वराळे प्रत्येकी 1 असे  एकूण 24 रुग्ण सापडले. 24518 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8090, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4279 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1284 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13653 रुग्ण तर ग्रामीण भागात 11865 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.08 टक्के आहे तर  मृत्यू दर 1.96 टक्के आहे.

 

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे  नगरपरिषद मध्ये 154 लोणावळा नगरपरिषद मध्ये 92 वडगाव नगरपंचायत मध्ये 18 व ग्रामीण भागात 235 असे एकूण 499 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.