Vadgaon Maval : मावळमध्ये ‘कोरोना’ विषाणूबाधित रुग्ण आढळलेला नाही -डॉ. चंद्रकांत लोहारे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात अद्यापही एकही ‘कोरोना’ विषाणूबाधित रुग्ण आढळून आला नसून आरोग्य विभाग कंबर कसून सज्ज आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मत मावळ तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी व्यक्त केले. ते ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.

मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये आरोग्य विभागाच्या अशा सेविकांच्या मार्फत जनजागृती केली जात असून मुंबई- पुणे सह राज्यातून आलेल्या नागरिकांची तसेच सहवासातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असुन त्यांच्यावर १४ दिवस उपचार करत आहोत. नागरिकांनी घाबरुन न जाता वैयक्तिक व सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवावा. अफवांवर विश्वास ठेवू नका.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी ठिकाणी तपासणी करावी. नागरिकांनी स्वच्छ हात धुवावे, थंड पेये टाळावे. गावातील व शहरातील नागरिकांनी बाहेर विनाकारण न फिरता घरातच राहावे.

आरोग्य विभागाच्या अशा सेविकांना आपल्या कुटुंबातील आजारपणाविषयी माहिती द्या. शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.