-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vadgaon maval : अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या तरुणाची आत्महत्या ; इंद्रायणी नदीपात्रात सापडला मृतदेह

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिचा खून करणाऱ्या युवकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी श्रीराम सुग्रीव गिरी याचा मृतदेह शुक्रवारी (दि. 6) दुपारी वराळे गावच्या हद्दीमध्ये इंद्रायणी नदीपात्रात आढळून आला.

बुधवारी सकाळी 11 वाजता आरोपी श्रीराम हा एका अल्पवयीन मुलीला घेऊन वडगाव मावळ येथील एक लॉजवर आला होता. हे दोघेजण लॉज मधील रूम नंबर 303 येथे थांबले. त्यानंतर अज्ञात कारणावरून श्रीराम याने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार करून खून केला. तिचा खून केल्यानंतर श्रीराम याने मुलगी आवरून खाली येत असल्याचे लॉजमधील स्टाफला सांगितले. काही वेळानंतर श्रीराम याने दुचाकीवरून लॉजवरून पोबारा केला.

खून झाल्याची बातमी मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली. पोलिसांना आरोपीची मोटारसायकल इंद्रायणी नदीच्या किनारी पडलेली दिसली. यावरून श्रीराम याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. एनडीआरएफच्या पथकाने पाणबुड्यांच्या मदतीने शोध सुरु केला असता अखेर शुक्रवारी (दि. 6) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वराळे गावच्या हद्दीमध्ये इंद्रायणी नदीपात्रात श्रीराम याचा मृतदेह आढळून आला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.