Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी वडगावचे माजी उपसरपंच व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वसंतराव वहिले यांनी निवेदनाद्वारे वडगाव मावळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे कि, दोन दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळुन मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. तरी, वडगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विनंती करण्यात येते की मावळ तालुक्‍यातील सर्व साकव पुल आणि ब्रिटीशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे.

यामध्ये कान्हे ते टाकवे बुद्रुक पूल,आंदर मावळ येथील माळेगाव बुद्रुक पूल, बेबड ओव्हळ पूल, इंदोरी पूल,तळेगाव स्टेशन पूल,सांगीसे पूल, पाथरगाव पूल सर्व पुलांची पहाणी करून त्वरीत स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या ठीकाणी जड वाहनास बंदी करून त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत. त्याचबरोबर छोटया- मोठ्या साकव पुलांची कामे त्वरीत जलद गतीने करण्यात यावी.

त्याचबरोबर वडगावातील जुना पुणे-मुंबई हायवेवरील फ्रेंडस् बेकरी येथील नाला दुरूस्त करून मोठया साइजच्या मोर्‍या टाकाव्यात. तसेच या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कारवाई, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.