Vadgaon Maval : गॅस सिलेंडर घरपोच देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव येथील एच पी गॅस एजन्सी कडून घरपोच सिलिंडरचा पुरवठा (Vadgaon Maval ) मागील 15 दिवसांपासून खंडित झाला आहे. सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एजन्सीने घरपोच गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कामगार सेल तर्फे करण्यात आली आहे. वडगाव राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले व नागरिकांच्या वतीने सदर गॅस एजन्सीला संपर्क करून निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वडगाव मावळ येथील ओमकार गॅस एजन्सीच्या वतीने वडगाव येथील नागरिकांना एचपी गॅसचे वाटप केले जाते परंतु गेल्या पंधरा-वीस दिवसा पासून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या दहावीच्या व शालेय परीक्षा चालू आहेत त्यामुळे विशेष करून महिलांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

Talegaon Dabhade : समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 

एजन्सीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. काही ज्येष्ठ नागरिक घरी असतात त्यांना जाणे येणे शक्य होत नाही तसेच काही लोकांकडे वाहने नाही. त्यामुळे त्यांना एजन्सी वरती जाऊन सिलेंडर आणता येत नाही अशा अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. तसेच घरपोच सिलेंडर देखील येत नाही.
गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्यात यावा तसेच कामगारांची संख्या वाढवावी. तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या कामगारांना गॅस एजन्सीचे ओळखपत्र द्यावे.  गॅस एजन्सीचा (Vadgaon Maval ) संपर्क भ्रमणध्वनी जाहीर करावा वरील मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, असेही वहिले यांनी निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.