Vadgaon Maval : वडगाव राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने गॅस सिलेंडर व सुविधा पुरवण्याची मागणी

एमपीसी न्यूज : वडगाव (Vadgaon Maval) शहरात कामगार क्षेत्रातील कुटुंबांची संख्या अधिक आहे. या कामगार वर्गाला वेळेत गॅस सिलेंडर मिळत नाही. तसेच सिलेंडर मिळण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने वडगाव येथील ओमकार एचपी गॅस सिलेंडर एजन्सीला निवेदन देण्यात आले.

यावेळी वडगाव राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले, कामगार सेल सदस्य सतीश राऊत, कैलास पाटोळे आदीजण उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वडगाव येथे कामगार क्षेत्रातील महिला व पुरुष जास्त प्रमाणावर वास्तव्यास आहे. त्यांना प्रत्यक्ष गॅस एजन्सीवर जाऊन गॅस सिलेंडर घेऊन येणे शक्य होत नाही. गेल्या महिन्याभरात गॅस पुरवठा व्यवस्थित झाला नाही, गॅस बुक करून देखील आठ दिवस सिलेंडर मिळत नव्हता, तसेच ऐन गणपतीच्या दिवसात अनेकांना गॅस संपल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन साजरा

एजन्सीच्या फोन नंबरवर फोन उचलत (Vadgaon Maval) नव्हते, गॅस एजन्सीच्या बाहेर कोणताही माहिती फलक नाही, तसेच गॅस एजन्सीच्या आवारात संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलेंडर भरण्याच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे. तरी गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून गॅस एजन्सीच्या ऑफिस बाहेर माहिती फलक लावून त्यावर कामकाजासाठी वेळ, कार्यालयाचा फोन नंबर, तसेच फर्स्ट एड बॉक्स बसवावा अशी मागणी, वडगाव राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.