Vadgaon Maval : मूकबधिरांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

एमपीसी न्यूज- पुण्यात समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या हजारो मूकबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणी मुख्यमंत्री फडवणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. या बाबतचे निवेदन वडगाव मावळचे नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी पुण्यात समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर मुकबधीर विद्यार्थी, युवक आंदोलन करीत होते. हे आंदोलन मोडीत काढण्याच्या हेतूने राज्यातील तुघलकी शासनाने या उपेक्षीत वर्गाच्या तरुणांवर अमानुष लाठीमार केल्यामुळे अनेक मुकबधीर आंदोलक जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (ग्रामीण) अध्यक्ष कैलास गायकवाड़, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष (शहर) सुनील दाभाडे, सरपंच दत्ता पड़वळ, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आशीष खांडगे, सचिन भंबक, चंद्रशेखर परचंड, सोमनाथ गायकवाड, विठ्ठल जाधव, कैलास खाडंभोर, नवनाथ पडवळ, वैभव नवघणे, नवनाथ जाधव, अफताब सय्यद, विलास शिंदे, कैलास आडकर, सोमनाथ केदारी, अक्षय नवघणे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.